नमस्कार मित्रांनो, title वाचून तुम्ही अपेक्षा करत असाल की ह्या ब्लॉगमध्ये “एक चांगला ब्लॉग कसा असावा” ह्याबद्दल माहिती मिळेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. कोणत्या गोष्टी असाव्यात, नसाव्यात, इमेजेस हव्यात का? फॉन्ट कोणता असावा ह्या सर्वबाबतीत तुम्हाला इथे मार्गदर्शन केले जाईल.
हा ब्लॉग लिहावा वाटलं त्यामागे एक स्टोरी आहे. ३-४ दिवसांपूर्वीच एक सर्वे वाचला त्यात लिहिल होत कि लोक आता वाचनाकडे वळतच नाहीत. माझं मत मात्र थोडं वेगळं आहे; पुस्तक घेऊन वाचल म्हणजे वाचन असं नव्हे तर आता मोबाईल/टॅब ह्यावरही वाचन करता येत आणि त्यालाही आपण वाचन या सदरात मोडू शकतो. पण त्यासाठी लोकांना मजकूर चांगल्या पद्धतीमध्ये द्यायला हवा आणि त्यातीलच एक मार्ग म्हणजे ब्लॉग याद्वारे उपलब्ध करून देता यायला हवा अन्यथा लोक व्हाट्सऍप विद्यापीठातीलच वाचन करत बसतील. So being a teacher first job is to inspire people हे लक्षात घेऊन “उत्तम मजकूर/ब्लॉग कसा असावा” ह्या विषयावरील हा ब्लॉग लिहावा वाटलं. ब्लॉगरने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ते म्हणजे आपल्याला वाचकांना काहीतरी द्यायचे आहे, त्यांना नुसतं ब्लॉगवर खिळवून ठेवणं हा पहिला हेतू नाहीये. आपण चांगला कन्टेन्ट दिला की आपोआपच वाचक आपले ब्लॉग्स वाचतील.
कोणत्याही ब्लॉगच्या सुरवातीला आपण आउटलाईन दिल्यास वाचकांस तो ब्लॉग उपयोगी आहे की नाही हे ठरवता येऊ शकेल. आपल्या ब्लॉगमधील हेडर्स, मुख्य विषय किती खोल आहे ह्याची माहिती, मजकुराची मांडणी ह्या गोष्टी आपण सुरवातीला संक्षिप्त स्वरूपात मांडू शकतो. काही हेडर्सना तुम्ही हायपरलिंकनेही कनेक्ट करू शकता त्यामुळे वाचकास एखाद्या विषयावर तात्काळ जाण्यास मदत होते. ह्या ब्लॉगमध्ये आपण ब्लॉग कसा असावा ह्याबद्दल माहिती घेतोय सो त्याची माहिती आपण सुरवातीच्या परिच्छेदामध्ये दिली आहे.
एखादा ब्लॉग लिहायचा म्हटलं कि सर्वात प्रथम विचार यायला हवा तो म्हणजे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल. व्हिडिओच्या जमान्यात वाचनाकडे जर तुम्हाला लोकांना आकर्षित करायचं असेल तर पहिलं पाऊल म्हणजे लोकांना आपल्या ब्लॉग पर्यंत आणलं पाहिजे आणि त्यासाठीच तुमच्या ब्लॉगच शीर्षक हे आकर्षक असायला हवे. ज्या पद्धतीत चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक चित्रपटाकडे आकर्षिले जातात तसेच ब्लॉगचं शीर्षकच तुमच्या व्ह्यूव्हर्सची संख्या वाढवू शकतील. एखाद्या शीर्षकामध्ये अंक + प्रश्नार्थक शब्द + किवर्ड + विशेषण + वाचकास टीप या पद्धतीमध्ये असल्यास तेआकर्षक दिसते. खाली काही उदाहरण दिली आहेत जी आपण ब्लॉगचं शीर्षक म्हणून वापरू शकतो.
• १० चुका ज्या प्रत्येक ट्रेडरने टाळाव्यात
• कशी असावी २०२३ मधील तुमची जीवनशैली
• ९ सुंदर जागा ज्या ट्रॅव्हलरनेआयुष्यात एकदा तरी बघाव्यात
एकाच विषयावर असणाऱ्या ब्लॉगमध्ये गोष्टी मात्र आपण विविध मांडत असतो. त्या सर्वाना योग्य पद्धतीने एकत्र दाखवण्यासाठी आपल्याला हेडर आणि सबहेडरचा वापर करता येतो. वेगवेगळ्या हेडरखाली लिहिल्यास एखादा टॉपिक वाचकांस शोधणे सोपे जाते. त्याचप्रमाणे एका नजरेत वाचकास अंदाज येऊ शकतो कि ह्या ब्लॉग मधून आपल्याला काय मिळू शकेल. हेडर्स आणि सबहेडर्स हे शॉर्ट असावेत त्याच प्रमाणे त्याच्याखाली जो विषय मांडला आहे तो रिफ्लेक्ट करणारे असावेत.
विविध प्रसंगांना विविध असे पोशाख घालणारे आपण सर्व ब्लॉग लिहिताना सुद्धा शब्दांच्या पोशाखांकडे तेवढ्याच गरजेने पाहणं महत्वाचा आहे. ब्लॉग मधली कोणत्याही विभागातील फॉन्ट हा नीट वाचता येईल असा असावा. प्रत्येक विभागात वेगवेगळा फॉन्ट, फॅन्सी फॉन्ट्स, Italics, Bold, Underline यांचा अति वापर या गोष्टी टाळाव्यात. शीर्षकाला असणारा फॉन्ट ठळक, मोठा असावा, तुलनेने हेडर्स/सब हेडर्सचा लहान परंतु ठळक असावा. प्रत्यक्ष विषय जिथे मांडलेला असेल त्याचा फॉन्ट हा साधा सरळ असावा. साधारणपणे Sans Serif Family मधील फॉन्ट हे प्रत्यक्ष कन्टेन्टच्या ठिकाणी वापरले जातात.
वाक्य आणि परिच्छेद लिहिताना ते खूप लांबट नसले पाहिजेत. मोजक्या शब्दांमध्ये तुमचा विषय तुम्हाला मांडता आला तर वाचक तुमचे ब्लॉग नेहमी follow करू शकतील. एका वाक्यात ५०-७५ अक्षरे आणि एका परिच्छेदात जास्तीत जास्त ६ वाक्यांचा समावेश हा चांगला समाजाला जातो. पण काही वेळेला मजकुराच्या गुणवत्तेला प्राधान्य देऊन ह्या गोष्टी बाजूला ठेवल्या तरी चालतात.
जर तुम्हाला तुमच्या ब्लॉगमधील एखादा शब्द वाचकांनी लक्षात ठेवावा वाटत असेल अथवा तो खूप महत्वाचा असेल तर त्या शब्दाला तुम्ही विशेष जोर देऊन प्रेझेंट करा. त्यासाठी तुम्ही Bold, Italic ह्या साधनांचा वापर करू शकता. ह्या साधनांचा अति वापरही करू नका अन्यथा तुमचा ब्लॉग वाचण्यास अवघड जाईल. जोर देण्यासाठी शक्यतो Underline चा वापर टाळावा कारण त्याचा वापर हायपरलिंकसाठी केला जातो. त्याचप्रमाणे एखादा तांत्रिक शब्द आला तर त्यावर mouse फिरवल्यास त्याबद्दल ची अधिक माहिती पॉप अप करता आल्यास वाचकास ती संज्ञा कळण्यास मदत होते.
बुलेट पॉईंटमुळेवाचकांना एका दृष्टीक्षेपात विषय लक्षात येण्यास मदत होते. ज्या वेळेस छोट्या छोट्या गोष्टी सांगायची वेळ येईल त्यावेळेस बुलेट पॉईंटचा वापर केल्यास ब्लॉग दिसायला सुबक दिसतो. उदा. बुलेटपॉईंट लिहिण्याचे फायदे :
• वाचण्यास सोपे
• विसरण्यास अवघड
• दिसायला सुबक
• इतरांपासून वेगळं उठावदार
तुमच्या ब्लॉगमध्ये एकदा तरी बुलेट पॉईंट्च वापर असावा.
मजकूर : वेगळ्या स्वरूपात
फोटोज, व्हिडिओज व इतर मल्टिमीडिया कन्टेन्ट ब्लॉगमध्ये ऍड केल्यास एखादा टॉपिक कमी प्रयत्नात वाचकांपर्यंत पोहोचवता येतो किंवा visuals मुळे चांगल्या पद्धतीने मांडता येतो. आलेख, चिन्ह यांचा वापर केल्यास शब्दांची संख्या कमी होते. ब्लॉगच्या सुरवातीला विषयासंबंधीत इमेज टाका त्याचप्रमाणे काही हेडर्सखालीही तुम्ही फोटोज ऍड करा. हा कन्टेन्ट ओरिजिनल असेल तर त्यास अजून वजन प्राप्त होईल. अन्यथा रॉयल्टी फ्री/ कायदेशीररित्या खरेदी केलेल्या इमेजेस वापरा. तेही शक्य नसेल तर जिथून तुम्ही मजकूर घेतला असेल त्यांचा संदर्भ द्या.
ब्लॉगच्या शेवटच्या टप्प्यात आपण ह्या विषयावरील अधिक माहिती जिथे उपलब्ध असेल त्याच्या लिंक्स देऊ शकतो. अथवा पूर्ण आर्टिकल मध्येही किवर्डसना हायपरलिंक करू शकतो. ह्या लिंक आपल्याच ब्लॉग्सच्या असतील तर ती अजून चांगली गोष्ट असेल कारण त्यामुळे वाचकांस लक्षात येईल कि आपण विविध विषय आणि वेगवेगळ्या पातळीपर्यंत माहिती देऊ शकतो. त्याचा एक वापर असाही आहे कि आलेल्या वाचकाला आपल्यात गुंतवून ठेवायचेआहे. अर्थात आपली जबाबदारीही तेवढीच वाढणार आहेकि आपण चांगला कन्टेन्ट तयार करून तो त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. लिंक्स प्रमाणे आपल्या वेबसाईट, व्हॅट्सऍप क्रमांक अथवा ई-मेल पाठवण्यासाठी बटण ह्याचाही वापर करू शकतो. काही वेळेला SEO साठी सुद्धा ह्याचा चांगला फायदा होऊ शकतो. ह्या ठिकाणी जस मी ब्लॉग कसा असावा ह्या बद्दल माहिती दिली त्याच प्रमाणेएखादा पॉवरपॉईंट शो कसा असावा ह्या बद्दल माहिती हवी असल्यास येथे क्लिक करून तुम्ही ती पाहू शकता.
आपण एखाद्या विषयाची मांडणी करणारोत त्या बरोबरीनेच आपण टिप्स देऊ शकतो. विषयातील एक्स्पर्टकडून योग्य माहिती देतो हे वाचकांच्या लक्षात आणून देणे , ब्लॉगमध्येएखादा प्रश्न विचारून वाचकांस विचार करायला भाग पाडणे, काही वेळेला एखादी गोष्ट पूर्ण सांगण्याऐवजी त्याबद्दल थोड रहस्य ठेवणे जेणेकरून वाचक ते जाणून घेण्यासाठी आपल्या इतर ब्लॉगला भेट देतील ह्या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या आहेत. एखाद दुसरी लिंक हि आपल्या ब्लॉग मध्येच दुसऱ्या हेडरला नेणारी असावी. एखादा ब्लॉग हा १२०० ते १५०० शब्दांचा असावा. एकूणच ब्लॉग जास्त मोठा नसावा, एक पान जास्तीतजास्त ५ मिनिटामध्ये पूर्ण वाचून होईल एवढे असावे. जर तुम्ही तांत्रिक गोष्टी समजावत असाल तर ब्लॉगच्या शेवटी Citations द्यायला विसरू नका. जेणेकरून आपल्याला विषयासंबंधी फेरपाडताळणी, नवीन माहिती अद्ययावत करण्यास मदत होईल. ब्लॉग लेखक जो असेल त्याची माहिती ब्लॉगच्या शेवटी असावी जेणेकरून त्याव्यक्तीबद्दल वाचकास थोडी कल्पना येईल. इतरांना समजावून देण्यासाठी मजकूर हेच उत्तम साधन असते. सो आपला ब्लॉग वाचून ते त्या विषयाबद्दल Inspire झाले तरच ते ब्लॉगचं यश असणार आहे.शेवटची गोष्ट एकच ती म्हणजे Blog हि एक व्हायरल होणारी गोष्ट नसून ती एक Long Term Investment असणारे. जेवढं जास्त काळ तुम्ही त्यात असाल तेवढा जास्त फायदा असणारे.
प्रतिक शितुत
रत्नागिरी
shitutpr@gmail.com